महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसींची जातनिहाय जनगणना कार्यात घ्यावी, यासह विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागातर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
सातारा : महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसींची जातनिहाय जनगणना कार्यात घ्यावी, यासह विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागातर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी ओबीसी काँग्रेस कमिटीच्या वतीने ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, सरचिटणीस मनोज कुमार तपासे, ओबीसी अध्यक्ष जगन्नाथ कुंभार, धैर्यशील सुकले, रतन लाड, संजय तडाके, सुरेश कुंभार, माधवराव साठे, शिवाजी गावडे, संतोष काशीद, रणधीर गायकवाड, प्रकाश फरांदे, दत्ता काशीद, विजय मोरे, सुनंदा खवळे, रंजना गाडगे, लता पवार, शितल मोरे, दिपाली पांडे, संगीता शिरसाठ इत्यादी उपस्थित होते.
महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना इतर पाच राज्यांप्रमाणे लागू करावी, बिहार राज्य प्रमाणे ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी मागासवर्गीय तसेच अल्पसंख्यांक समाजाशी संलग्न विविध महामंडळाचे कर्ज माफ करून शासन दरबारी आणि कोर्टात असणाऱ्या केसेस त्वरित मागे घेण्यात याव्यात, निवडणूकांमध्ये ईव्हीएम चा वापर बंद करण्यात यावा, महाविकास आघाडीच्या काळात जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृह सुरू करण्याच्या झालेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी व्हावी इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्या मान्य न झाल्यास 15 मे 2023 पासून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रदेश ओबीसी कार्यकारणीच्या वतीने देण्यात आला आहे.