अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 मार्च रोजी दुपारी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान रोहित संजय शिंदे रा. खेड, ता. सातारा याने त्याच्या ताब्यातील अल्टो कार क्र. एमएच 12 एफएफ 9919 ही अविचाराने, भरधाव वेगात चालवून धन्यकुमार गोरख माने रा. सदर बाजार सातारा यांच्या मोटरसायकल क्र. एमएच 11 सीयु 3911 ला धडक देऊन अपघातात माने आणि त्यांचा मित्र सागर अरुण काळे यांना जखमी केले आहे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.