सातारा तालुक्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
सातारा : सातारा तालुक्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ११ रोजी ४.३० वाजण्याच्या सुमारास धनगरवाडी (कोडोली), ता. सातारा येथून रुपाली रमाकांत मोडे, वय ३५, रा. आंबवणे, ता. पाटण ही विवाहित महिला सासरी आंबवणे येथे जाते असे सांगून निघून गेली ती घरी पोहोचली नसल्याची तक्रार नितीन लक्ष्मण टोपले यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसऱ्या घटनेत दि.१५ रोजी ११.३० वाजण्याच्या सुमारास आंबेवाडी, ता. सातारा येथून ज्योती नेताजी जाधव, वय २३ ही युवती राहत्या घरातून निघून गेल्याची तक्रार तिचे वडील नेताजी रघुनाथ जाधव यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
तिसऱ्या घटनेत मोळाचा ओढा सातारा परिसरात राहणारी विवाहिता ही घरातील झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून मुंबईला जाते असे सांगून निघून गेली आहे. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार भिंगारदेवे करीत आहेत.


