संपूर्ण राज्यभरात बिफ हब म्हणून ओळखल्या जाणार्या फलटण तालुक्यामध्ये गेल्या अनेक दशकांपासून राजरोसपणे गोवंशाची कत्तल केली जात होती. महानुभाव पंथाची काशी समजल्या जाणार्या फलटणला याच बिफ माफियांनी आता जेरीस आणले आहे.
फलटण : संपूर्ण राज्यभरात बिफ हब म्हणून ओळखल्या जाणार्या फलटण तालुक्यामध्ये गेल्या अनेक दशकांपासून राजरोसपणे गोवंशाची कत्तल केली जात होती. महानुभाव पंथाची काशी समजल्या जाणार्या फलटणला याच बिफ माफियांनी आता जेरीस आणले आहे. कालच या बिफ माफियांनी गोवंशाची तस्करी पकडली म्हणून दोघा गोरक्षकांना बेदम मारहाण केली. यामध्ये एक गोरक्षक गंभीर जखमी झाला आहे. गाई तर कापतच होतो, आता माणसेही कापणार असल्याची धमकी संबंधित असणार्या बिफ माफियांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांना दिली असून या प्रकारामुळे फलटणच्या पोलिसिंगवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिफ कॅपिटल म्हणून फलटण शहर कूप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातीलच काय, परंतू देशातील बिफ माफियांकडून फलटणमधील अनेक कसायांना हाताशी धरुन राजरोसपणे हजारो गोवंशांचे शिरकाण केले जात आहे. 2015 साली महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा पारित झाला. त्यामुळे महाराष्ट्रात कोठेही गोवंशाची हत्या करता येणार नाही. असे असतानाही फलटणमध्ये हा कायदाच फाट्यावर मारुन आमचे कोणीही, काहीही वाकडे करणार नाही, या तोर्यात फलटणमधील कसायांनी अलगुडवाडी, ता. फलटण येथे महाराष्ट्र फूड प्रोसेसिंग ऍण्ड कोल्ड स्टोरेज नावाने अद्ययावत कत्तलखाना सुरु केला. अर्थात याला पाठबळही फलटण नरेशांचेच. सभापतीपद हाताशी असल्याने फलटण नरेशांनी नावात रामात असला तरी मी कृत्य रावणाचेच करतो, पैशासाठी मातीच काय शेणही खावू शकतो, हेही फलटणकरांना दाखवून दिले. फलटणमधील पोलीस हप्त्यापुढे बांधील असल्याने त्यांनीही या सर्व प्रकाराकडे आतापर्यंत कानाडोळा केलेला आहे. प्रांतांपासून जिल्हाधिकार्यांकडे तक्रारी झाल्या. मात्र, कारवाई शून्य. सगळेच पाकिटापुढे मिंधे झाले. त्यामुळे आतापर्यंत फलटणमधील अवैध कत्तलखान्यांवर कारवाई होवू शकली नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना तर फलटणमधून हजारो टन मांस मुंबई-पुण्यासह आखाती देशात निर्यात करण्यात येत होते. यामधून फलटणमधील बिफ माफियांना तसेच फलटण नरेशांची कोट्यवधींची बेगमी झाली. याच मिळणार्या पैशातून फलटणमधील बिफ माफिया मस्तवाल झाले आहेत. विरोध करणार्या गोरक्षकांनाच नव्हे तर सामान्य लोकांवरही हात उचलायला आता हे बिफ माफिया मागेपुढे पाहत नाहीत.
काल दि. 15 रोजी धुळदेव, ता. फलटण येथे देशी खिलार जातीच्या कालवडींची तस्करी करणार्या वाहनाला फलटणमधील अमोल जाधव या गोरक्षकाने व त्याच्या सहकार्याने माहितीच्या आधारे अडवून ठेवले होते. यानंतर संबंधित चालकाने याबाबतची माहिती संबंधित कसायांना दिली. यानंतर इनायत कुरेशी, हुसेन कुरेशी, वाहीद कुरेशी, अरबाझ कुरेशी यांनी घटनास्थळी जात हॉकी स्टिक, लोखंडी गजाने जाधव व त्याच्या सहकार्याला गाडी आडवल्याचा जाब विचारत बेदम मारहाण केली. यामध्ये गोरक्षक जाधव गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मात्र गुन्हा नोंद झाला तरी फलटण पोलीस या प्रकरणातील संबंधित आरोपींवर काय कारवाई करतात, हेही पाहणे भविष्यात औत्सुक्याचे ठरणार आहे.
पिस्तुलासह तीक्ष्ण हत्यारांची दहशत
फलटणमधील बिफ माफियांनी गेल्या दीड-दोन दशकांत फलटण नरेशांच्या आशिर्वादाने कोट्यवधींमध्ये पैसा मिळवला आहे. त्याच पैशाच्या जोरावर ते आता मस्ती करु लागले आहेत. पोलीस आणि प्रशासनाला पैसा फेकला की ते आपल्या तालावर नाचतात, हे त्यांनी ओळखल्याने ते आता कोणालाच मोजत नाहीत. एखाद्या गोरक्षकाने गोवंशाची तस्करी करणारी गाडी पकडण्याचा प्रयत्न केला तर त्याला बेदम चोप देवून हाकलवून दिले जाते. गेली कित्येक वर्षे हाच प्रकार फलटणमध्ये सुरु आहे. गो-हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी करायला सातारा पोलीस कमी पडत आहेत? की मिळणार्या हप्त्यांमुळे ते हतबल झाले आहेत? याचा तपास पोलीस अधीक्षकांनी करायला हवा. काल घडलेल्या घटनेमध्ये बिफ माफियांच्या हातात तीक्ष्ण धारदार हत्यारे आणि कंबरेला अग्नीशस्त्रही खोचले होते. याचा तपासही आता पोलिसांनी पुढे येवून करायला हवा.