maharashtra

बाल विवाहातून अल्पवयीन मुलीची प्रसूती, पतीवर पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा


प्रेम प्रकरणातून एक वर्षापूर्वी अल्पवयीन मुली बरोबर बालविवाह होऊन त्या अल्पवयीन मुलीची प्रसूती सातारा येथील जिल्हा रुग्णालयात झाली असून तिच्या पतीवर पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : प्रेम प्रकरणातून एक वर्षापूर्वी अल्पवयीन मुली बरोबर बालविवाह होऊन त्या अल्पवयीन मुलीची प्रसूती सातारा येथील जिल्हा रुग्णालयात झाली असून तिच्या पतीवर पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी विवाहित अल्पवयीन मुलगी हिने दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी हिचे लग्न दिनांक ६ एप्रिल २०२२ रोजी साखरवाडी येथे झाले होते. त्यानंतर दोघा कुटुंबांच्या सहमतीने सदर मुलगी पती यांचे घरी राहू लागली. त्यानंतर सदरची अल्पवयीन विवाहिता गरोदर राहिली. पतीने साखरवाडी येथे डॉक्टर काळे यांच्याकडे औषध उपचार घेतला. दि १३ मार्च २०२३ रोजी फिर्यादीच्या पोटात दुखू लागले, सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे ऍडमिट केले. ऍडमिट करताना डॉक्टरांनी फिर्यादीचे वय विचारले असता फिर्यादीच्या आईने वय १८ वर्षे सांगितले. डॉक्टरांनी आम्हाला आधार कार्ड मागितले असता आधार कार्डावर जन्मतारीख १३ सप्टेंबर २००५ अशी होती. त्यावेळी डॉक्टरांनी फिर्यादीस सांगितले कि तुझे वय १८ पूर्ण झाले नसताना तू लग्न कसे केले. त्यावेळी फिर्यादीने सांगितले की आमचे दोघाचे लग्न प्रेम विवाहातून झाले आहे.
अल्पवयीन मुली बरोबर विवाह करुन कमी वय असताना देखील तिला गरोदर केल्या प्रकरणी प्रसूती च्या वेळी घटना उघडकीस आल्याने पतीच्या विरोधात पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.