Satara

esahas.com

स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी

त्रिपुटी, तालुका कोरेगाव च्या हद्दीत कोरेगाव रस्त्यावर मालवाहतूक टेम्पो आणि स्विफ्ट कार यांची धडक होऊन यामध्ये एक महिला जखमी झाल्याची घटना दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 11 च्या दरम्यान घडली. याप्रकरणी राहुल दशरथ भोसले शांतीनगर कोरेगाव यांनी फिर्याद दिली आहे.

esahas.com

ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

भरतगाव वाडी, तालुका सातारा येथे लाकडी खोपीमध्ये झोपलेल्या ठिकाणी ट्रॅक्टर शिरून अनिता शिवाजी सोनवणे वय 30 मूळ रा. ताराबाद, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

esahas.com

महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

दुचाकीची चोरी

एका मंगल कार्यालयाच्या समोर लावलेल्या दुचाकीची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा

अपघातात एसटीचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी

पुणे-बंगलोर महामार्गावर सातार्‍यात शेंद्रे गावच्या हद्दीत महामार्गालगत असलेल्या चप्पलच्या मॉलमध्ये सायंकाळी एका ग्राहकाकडून बंदुकीतून चुकून गोळी सुटून कामगार जखमी झाल्याची घटना घडली. उलफिद युसूफ खान असे जखमी कामगाराचे नाव आहे. जखमी कामगाराला सातार्‍यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

esahas.com

झुपकेदार मिशांची सातार्‍यात अमृत महोत्सवी मिश्किली

हरवत चाललेली मराठमोळी संस्कृती, प्रत्येक ठिकाणी सुरू असलेला भ्रष्टाचार, आधुनिक किचन घराची व्यवस्था, आणि बायको आधी प्रेयसी मिळता मिळता राहून गेली, अशा अनेक सामाजिक आणि आयुष्याच्या उलथापालथी वर नर्मविनोदी शैलीने नेमके बोट ठेवत हास्यकवी अशोक नायगावकर यांनी सातारकरांना खळखळून हसविले.

esahas.com

शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या आर्थिक मागास प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना कर्ज देण्यास बँक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापकांनी टाळाटाळ केल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख (ठाकरे गट) सचिन मोहिते यांनी संबधित व्यवस्थापकाची चांगलीच कानउघाडणी केली. वेळेत कर्ज न दिल्यास या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

esahas.com

जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्‍यांविरोधात सायरन आंदोलन

जावली तालुक्यातील अवैध दारुविक्रीमुळे नागरिकांच्या संसाराची वाताहात होत आहे. या अवैध धंदेवाल्यांविरोधात आम आदमी पक्षाने दंड थोपटले असून येत्या 10 एप्रिलपर्यंत हे धंदे बंद न झाल्यास आम आदमी पक्षाच्यावतीने पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायरन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

esahas.com

मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल

एकास मारहाण केल्याप्रकरणी दहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.