भरतगाव वाडी, तालुका सातारा येथे लाकडी खोपीमध्ये झोपलेल्या ठिकाणी ट्रॅक्टर शिरून अनिता शिवाजी सोनवणे वय 30 मूळ रा. ताराबाद, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सातारा : भरतगाव वाडी, तालुका सातारा येथे लाकडी खोपीमध्ये झोपलेल्या ठिकाणी ट्रॅक्टर शिरून अनिता शिवाजी सोनवणे वय 30 मूळ रा. ताराबाद, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी डॉक्टर एस पी कवारे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे
याबाबतची अधिक माहिती अशी, दिनांक 21 मार्च रोजी रात्री दहा वाजता मयत अनिता सोनवणे या भरतगाव वाडी येथे खोपी मध्ये झोपल्या होत्या. त्यावेळी खोपी मध्ये ट्रॅक्टर अचानक शिरून त्या जबर जखमी झाल्या. त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार करता नेले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तपास फौजदार एस. आर. देसाई करत आहेत.


