महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 3 मार्च रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास सातारा परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तबरेज राजू मुल्ला, शाहीन तबरेज मुल्ला, इमरान बाबालाल मुल्ला तिघेही रा. एलबीएस कॉलेज जवळ, मल्हार पेठ, सातारा यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.


