अपघातात एसटीचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात एसटीचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास संजय गंगाराम शिंदे रा. दौंड, ता. दौंड, जिल्हा पुणे हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस क्रमांक एमएच 07 सी 7579 घेऊन जात असताना शिवथर तालुका सातारा गावच्या हद्दीतील पवन ढाब्याच्या जवळ समोरून जात असलेल्या ट्रक वरील चालकाने अचानक ब्रेक मारल्यामुळे शिंदे यांच्या एसटी बसचा अपघात होऊन एसटी बसचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.


