पुणे-बंगलोर महामार्गावर सातार्यात शेंद्रे गावच्या हद्दीत महामार्गालगत असलेल्या चप्पलच्या मॉलमध्ये सायंकाळी एका ग्राहकाकडून बंदुकीतून चुकून गोळी सुटून कामगार जखमी झाल्याची घटना घडली. उलफिद युसूफ खान असे जखमी कामगाराचे नाव आहे. जखमी कामगाराला सातार्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सातारा : पुणे-बंगलोर महामार्गावर सातार्यात शेंद्रे गावच्या हद्दीत महामार्गालगत असलेल्या चप्पलच्या मॉलमध्ये सायंकाळी एका ग्राहकाकडून बंदुकीतून चुकून गोळी सुटून कामगार जखमी झाल्याची घटना घडली. उलफिद युसूफ खान असे जखमी कामगाराचे नाव आहे. जखमी कामगाराला सातार्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रियांका शू मॉल मध्ये नगर जिल्ह्यातील अभय आवटे हे ग्राहक लायसन्स असलेल्या रिव्हॉल्व्हरसाठी लेदरचा कव्हर घेण्यासाठी गेले होते. त्यावेळेस त्याच्या हातून चुकून ट्रिगर दाबला गेल्याने बंदुकीतून गोळी सुटून कामगारांच्या मांडीला लागली आहे. उलफिद हे दुकानात काउंटरच्या बाजूला होते. गोळी मांडीत घुसून रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी पाटण तालुक्यात झालेली घटना ताजी असतानाच पुन्हा जिल्ह्यात गोळीबार झाल्याने या अचानक घडलेल्या घटनेने जिल्हा पुन्हा हादरला. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी सातारा तालुका पोलीस दाखल झाले असून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.


