maharashtra

दुचाकीची चोरी


एका मंगल कार्यालयाच्या समोर लावलेल्या दुचाकीची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : एका मंगल कार्यालयाच्या समोर लावलेल्या दुचाकीची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तानाजी बाळकृष्ण शेळके रा. शेळकेवाडी, पोस्ट सोनगाव, ता. सातारा यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एमएच 11 बीजे 1626 ही सोनगाव तालुका सातारा येथील सप्तपदी मंगल कार्यालय येथे पार्क केली होती.  अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली असल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे अधिक तपास पोलीस नाईक एस. बी. महांगडे करीत आहेत.