Satara

esahas.com

आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये सर्वात जास्त खर्च उच्च शिक्षणावर आणि अत्यंत कमी खर्च प्राथमिक शिक्षणावर होतो.हेच भारतीय शिक्षण पद्धतीचे सर्वात मोठे दुर्दैव आहे असे मत प्रा.नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले.

रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती राज्यस्तरीय परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन बानुगडे - पाटील बोलत होते. व्यासपीठावर खासदार श्रीनिवास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, श्री गाडगेबाबा मिशन मुंबईचे चेअरमन मधुसूदन मोहिते पाटील, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार माने पाटील, श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरुण माने, विद्यार्थी विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष्या मनिषा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

esahas.com

वाढोबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात बनवडीच्या श्री वाढसिद्धनाथाची बगाड यात्रा उत्साहात साजरी; दर्शनासाठी उसळली भाविकांची मोठी गर्दी

वाढोबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात बनवडीच्या श्री वाढसिद्धनाथाची बगाड यात्रा उत्साहात साजरी; दर्शनासाठी उसळली भाविकांची मोठी गर्दी

esahas.com

दौलतनगरात दुचाकीवरुन वाद

भाडेकरुची दुचाकी काढण्यास सांगण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. संशयित आरोपीने फिर्यादीच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला. तसेच पत्नीला शिवीगाळ केली.

esahas.com

मुख्याधिकाऱ्यांची केली बनावट सही

जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची बनावट सहीचा ना हरकत दाखल तयार करुन तो न्यायालयात सादर केल्याप्रकरणी नेचर इन नीड सीबीएमडब्ल्यूटीएफ संस्थेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

esahas.com

शाहू उद्यानात मुलांना मारहाण

येथील गुरुवार पेठेतील श्रीमंत छ. शाहू उद्यानात शाळेतील भांडणाच्या कारणातून पाच जणांनी तीन मुलांना मारहाण केली. या प्रकरणी मुलांचे वडील सुरज अविनाश गाडे (वय ४४, रा. गुरुवार पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली असून, पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

शनिवार पेठेतून दुचाकीची चोरी

येथील शनिवार पेठेतील गजानन मंगल कार्यालयासमोर असलेल्या रस्त्यावरुन दीपक वसंत खांडके (वय ५७, रा. पोवई नाका, सातारा) यांची दुचाकी (एमएच ११ एन ९२८) अज्ञाताने चोरुन नेली.

esahas.com

सहज योग परिवाराच्या वतीने मंगळवारी आत्मसाक्षात्कार योग कार्यक्रम

परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहज योग परिवाराद्वारे संगीत, आत्मसाक्षात्कार व ध्यानाचा कार्यक्रम ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ग्रीस, भारत व मलेशिया या देशांतील ३० कलाकारांतर्फे मंगळवारी, दि. ४ रोजी सायंकाळी ७ वा सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात आयोजित केला आहे.

esahas.com

सैदापूरचा मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

सैदापूर (ता. कराड) येथील मंडलाधिकारी विनायक दिलीप पाटील याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. खासगी इसमास 10 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या लाचलुचपतच्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली.

esahas.com

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जेसीबी चालकावर गुन्हा

एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जेसीबी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी पाच जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.