भाडेकरुची दुचाकी काढण्यास सांगण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. संशयित आरोपीने फिर्यादीच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला. तसेच पत्नीला शिवीगाळ केली.
सातारा : भाडेकरुची दुचाकी काढण्यास सांगण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. संशयित आरोपीने फिर्यादीच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला. तसेच पत्नीला शिवीगाळ केली. ही घटना दौलतनगरातील अलंकार कॉलनी येथे दि. ३१ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता घडली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
प्रदीप शिवाजी कदम (वय ४७, रा. अलंकार कॉलनी, दौलतनगर, सातारा) यांनी फिर्याद दिली असून, संभाजी शिवाजी कदम (रा. अलंकार कॉलनी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास पोलीस हवालदार गाढवे करत आहेत.


