maharashtra
वाढोबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात बनवडीच्या श्री वाढसिद्धनाथाची बगाड यात्रा उत्साहात साजरी; दर्शनासाठी उसळली भाविकांची मोठी गर्दी
वाढोबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात बनवडीच्या श्री वाढसिद्धनाथाची बगाड यात्रा उत्साहात साजरी; दर्शनासाठी उसळली भाविकांची मोठी गर्दी
केवळ कोरेगाव तालुकाच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली बनवडी पंचक्रोशीतील श्री वाढसिद्धनाथाची बगाड यात्रा शुक्रवारी उत्साहात साजरी करण्यात आली. वाढोबाच्या नावानं चांगभलं जयघोषात गुलालाच्या उधळणीत यात्रा साजरी झाली. वरूणराजाने देखील हजेरी लावत वाढसिद्धनाथाला साक्षात नमस्कार केला.
हजारो वर्षांची गौरवशाली परंपरा बनवडीसह दुधनवाडी व अरबवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जपली आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाढोबाची यात्रा हा परिसरातला मोठा उत्सव असतो. वाठार स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांच्या नेतृत्वाखाली यात्रा कालावधीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.