जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची बनावट सहीचा ना हरकत दाखल तयार करुन तो न्यायालयात सादर केल्याप्रकरणी नेचर इन नीड सीबीएमडब्ल्यूटीएफ संस्थेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सातारा : जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची बनावट सहीचा ना हरकत दाखल तयार करुन तो न्यायालयात सादर केल्याप्रकरणी नेचर इन नीड सीबीएमडब्ल्यूटीएफ संस्थेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. १७ फेब्रुवारी २०२२ ते ७ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान घडली.
या प्रकरणी सातारा पालिकेतील आरोग्य विभागप्रमुख प्रकाश लक्ष्मण राठोड यांनी फिर्यादी दिली असून, संस्थेचे आप्पासो बळवंत जाधव (रा. कर्जगार चेंबर्स, इंजिनिअरींग असोसिएशन समोर, शिवाजीनगर, कोल्हापूर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत नमूद केले आहे की, नेचर इन नीड सीबीएमडब्ल्यूटीएफ संस्थेस जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन करण्यासाठी असोसिएशन ऑफ हॉस्पिटल ओनर्स सातारा यांच्या मालकीच्या सोनगाव कचरा डेपो शेजारी सोनगाव येथील गट नंबर ८३ मध्ये प्लान्ट चालवण्यासाठी दिला जात आहे.
हा प्लान्ट चालवण्यासाठी सातारा पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रामध्ये फेरफार करुन तसेच मुख्याधिकाऱ्यांची बनावट सहीचा दाखल तयार केला आहे. तसेच तो न्यायालयामध्ये सादर करुन शासनाची फसवणूक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत आहेत.


