सातारा : दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुनील लक्ष्मण निकम राहणार नागठाणे तालुका सातारा यांच्या नागठाणे येथील रानात मोटरसायकलचा अपघात झाला होता. त्यामुळे त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.


