maharashtra

शाहू उद्यानात मुलांना मारहाण


येथील गुरुवार पेठेतील श्रीमंत छ. शाहू उद्यानात शाळेतील भांडणाच्या कारणातून पाच जणांनी तीन मुलांना मारहाण केली. या प्रकरणी मुलांचे वडील सुरज अविनाश गाडे (वय ४४, रा. गुरुवार पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली असून, पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : येथील गुरुवार पेठेतील श्रीमंत छ. शाहू उद्यानात शाळेतील भांडणाच्या कारणातून पाच जणांनी तीन मुलांना मारहाण केली. या प्रकरणी मुलांचे वडील सुरज अविनाश गाडे (वय ४४, रा. गुरुवार पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली असून, पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत नमूद केले आहे की, बागेत चार मुले खेळत असताना शाळेतील भांडणाच्या कारणातून 'तुला शाळेत मारेलेले कमी झाले आहे का,' अशी दमदाटी करुन संशयित आरोपी पाच जणांनी त्यांना मारहाण केली. त्यातील एकाला लाकडी काठीने पाठीवर व तोंडावर मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक मोरे करत आहेत.