सातारा : ऑनलाईन आर्थिक फसवणूक प्रकरणी अज्ञातावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय रामदास कापरे रा. जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे यांचे लोणंद तालुका खंडाळा गावच्या हद्दीत केक शॉप आहे. दि. 13 एप्रिल रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एका नंबर वरून अनोळखी व्यक्तीने पेटीएम नेट बँकिंग बंद होणार असल्या बाबतचा मेसेज पाठवून त्यासाठी लॉगिन आयडी अपडेट करण्याकरता लिंक पाठवून कापरे यांचा एक्सेस प्राप्त केला. यानंतर कापरे यांच्या खात्यातून 4 लाख 16 हजार 624 रुपये परस्पर काढून घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबतची फिर्याद लोणंद पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक इंगळे करीत आहेत.