सातारा : आज संपूर्ण जग करोनाच्या विळख्यात सापडले आहे. सातारामध्येही कोरोना कहर वाढला आहे. अशाप्रसंगी कोरोनाग्रस्त पेशंटला हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध होत नाही. सातारकरांची गरज ओळखून सातारकरांच्या सेवेकरिता हॉटेल रधिका पॅलेसमध्ये पाटील हॉस्पिटल प्रा. लि. कोरेगाव यांच्या सहकार्याने कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. ज्या पेशंट्सची ऑक्सिजन लेवल 94 पेक्षा जास्त आहे व वय दहा ते साठ ...
जिल्ह्यात बाधितांचे आकडे वाढण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. दररोज सुमारे 25 ते 35 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे होत असल्यामुळे सातारा जिल्हावासीयांच्या काळजीत भर पडली आहे. मंगळवारीदेखील 35 रुग्णांचा उपचाराम्यान मृत्यू झाला तर 973 जण बाधित झाले.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या शासनाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेंतर्गत आरोग्यसंपन्न महाराष्ट्र घडवण्यामध्ये हातभार लावण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनानेही आरोग्यसंपन्न सातारा जिल्हा घडवण्याचा संकल्प केलेला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढतच असून, सोमवारी दिवसभरात 31 रुग्णांचा मृत्यू झाला तर 898 जण कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 25,476 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात तब्बल 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर 629 जण कोरोनाबाधित झाले आहेत. उग्र स्वरूप धारण केलेल्या या महामारीमुळे मृत्यूचे तांडव सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याबरोबरच नागरिकांनीही सतर्कता बाळणे गरजेचे आहे.
जगात कोरोना महामारीनं थैमान घातल्यामुळं संसर्ग टाळण्यासाठी शासनानं सर्वत्र ‘लॉकडाऊन’ जाहीर केलं. त्यामुळं सर्वांना ‘घरबंद’ व्हावं लागलं. दरम्यानच्या काळात सर्व उद्योग-धंदे बंद पडले. त्यामुळे हातावर पोट असणार्यांवर उपासमारीची वेळ आली. त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. पण समाजात अशी काही माणसं असतात की, ज्यांच्यात समाजाप्रती काहीतरी नवं करून दाखवण्याची तळमळ असते. अशाच एका तरुण ‘कोरोना योद्ध्या’नं लॉकडाऊन काळात मुंबई माण खुर्द शिवाजीनगर येथील गरीब-गरजूंना मदतीचा हात अन् मायेची ऊब देऊन समाज
सातारच्या राजघराण्याच्या स्नुषा तसेच खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या काकी चंद्रलेखाराजे भोसले यांचे आज (दि. 13) रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
जिल्हा अत्यंत बिकट परिस्थितीमधून जात असून, कोरोनाचे संकट आणखी उग्र रूप धारण करू लागले आहे. जिल्ह्यात शनिवारी 25 जणांचा मृत्यू झाला तर 1086 जण बाधित सापडल्यामुळे सातारकरांची चिंता आणखी वाढली आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 23,949 इतकी झाली आहे.
सध्या समाज माध्यमातून सातारा जिल्ह्याला कृत्रिम प्राण वायुचा पुरवठा बंद केला जाईल असे एका पत्राचा हवाला देऊन बातम्या दिल्या जात आहेत. ती प्रशासकीय तांत्रिक बाब असून त्यातून प्रशासनाने मार्ग काढला असून पूर्वी सारखाच पुरवठा सुरु राहिल असे जिल्हाधिकाऱ्यानी सांगितले आहे,
सातारा शहराच्या हद्दवाढीमध्ये त्रिशंकू भागातील आकाशवाणी झोपडपट्टीचा समावेश झाला. हद्दवाढ मंजूर करून त्रिशंकू भागाला विकासाची कवाडे खुली करुन दिल्याबद्दल आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अभिनंदन करत आकाशवाणी येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हद्दवाढ मंजूर केल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानन्यात आले.