sports

जिल्ह्यात 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू

दिवसभरात 629 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह : एकूण रुग्णसंख्या 24,578

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात तब्बल 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर 629 जण कोरोनाबाधित झाले आहेत. उग्र स्वरूप धारण केलेल्या या महामारीमुळे मृत्यूचे तांडव सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याबरोबरच नागरिकांनीही सतर्कता बाळणे गरजेचे आहे. 

सातारा : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात तब्बल 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर 629 जण कोरोनाबाधित झाले आहेत. उग्र स्वरूप धारण केलेल्या या महामारीमुळे मृत्यूचे तांडव सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याबरोबरच नागरिकांनीही सतर्कता बाळणे गरजेचे आहे. 

जिल्ह्यात आणखी 266 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 266 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून, 246 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

246 जणांचे स्त्राव तपासणीला 
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 20, खंडाळा 103, पानमळेवाडी 26, मायणी 162, महाबळेश्‍वर 35, खावली 41 अशा एकूण 246 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.