sports

सातारच्या राजघराण्याच्या स्नुषा चंद्रलेखाराजे भोसले यांचे निधन


सातारच्या राजघराण्याच्या स्नुषा तसेच खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या काकी चंद्रलेखाराजे भोसले यांचे आज (दि. 13) रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

सातारा : सातारच्या राजघराण्याच्या स्नुषा तसेच खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या काकी चंद्रलेखाराजे भोसले यांचे आज (दि. 13) रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. साताराचे माजी  नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांच्या त्या पत्नी होत.

महिला मंडळाची शाळा, विविध सामाजिक संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. सातारा शहरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग होता. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर सातारा व पुणे येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांच्यावर अदालत राजवाडा येथेच उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावली होती. दरम्यान , रविवारी दुपाच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.