sports

पाटील हॉस्पिटल, कोरेगाव व हॉटेल राधिका पॅलेसचे सातार्‍यात पहिले प्रायव्हेट कोरोना केअर सेंटर सुरू 


सातारा : आज संपूर्ण जग करोनाच्या विळख्यात सापडले आहे. सातारामध्येही कोरोना कहर वाढला आहे. अशाप्रसंगी कोरोनाग्रस्त पेशंटला हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध होत नाही. सातारकरांची गरज ओळखून सातारकरांच्या सेवेकरिता हॉटेल रधिका पॅलेसमध्ये पाटील हॉस्पिटल प्रा. लि. कोरेगाव यांच्या सहकार्याने कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. ज्या पेशंट्सची ऑक्सिजन लेवल 94 पेक्षा जास्त आहे व वय दहा ते साठ आहे, ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही, अशा असीमटेमेटीक पेशंटकरिता हे प्रायव्हेट कोरोना केअर सेंटर चालू केले आहे.

हॉटेल राधिका पॅलेस नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. यापूर्वीही मागील महिन्यात विदेशावरून येणार्‍या प्रवाशांसाठी हॉटेल राधिका पॅलेसमध्ये आयसोलेशनची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण 60 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.  डॉ. रमेश पाटील व डॉ. आदीश पाटील, डॉ. ओंकार पाटील यांनी स्वतः लक्ष देऊन हे सेंटर सुरू केले. त्यासाठी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी त्वरित मान्यता दिली व सेंटर कसे असावे यासाठी मार्गदर्शन केले. 
या सेंटरममध्ये डॉक्टर्सचे निरीक्षण, राहण्याची व्यवस्था, जेवण, नाष्टा,  इत्यादी गोष्टींची व्यवस्था आहे. हॉटेल राधिका पॅलेस गेली 28 वर्षे आपल्या चांगल्या वेळेस आपल्या बरोबर होता आणि या कठीण वेळेसही तुमच्या बरोबर आहे. हे प्रायव्हेट करोना केअर सेंटर असल्याने सरकारी मार्गदर्शननाप्रमाणे पेशंटकडून शुल्क घेतले जाणार असल्याची माहिती हॉटेल राधिका व्यवस्थापनाने देत डॉ. रमेश पाटील व डॉ. आदिश पाटील, डॉ. ओंकार पाटील यांचेही या उपक्रमाबद्दल कौतूक केले आहे.

ज्या पेशंटना अशा प्रकारच्या व्यवस्थेची गरज असेल त्यांनी पाटील हॉस्पिटल कोरेगाव 9881662753 या नंबरवर किंवा 02162-233133 या नंबर वर फोन करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

वैशिष्ट्ये
आरामदायी सुविधा
सिंगल किंवा डबल बेडची उपलब्धता 
पौष्टिक आणि स्वादिष्ट जेवण
सॅनिटायजेशन आणि हायजिनची परिपूर्ण व्यवस्था
डॉक्टर आणि नर्सेस द्वारा मेडिकल सुपरव्हीजन
एम. डी. फिजिशियनद्वारा ऑनलाईन कन्सल्टेशन
ओरल मेडिकेशन
लॅब टेक्निशिअनद्वारा तपासणी सॅम्पल कलेक्शनची सुविधा
गरजेनुसार अँब्युलन्स सुविधा
गरजेनुसार ऑक्सिजन सुविधा
गरज असल्यास हॉस्पिटलमध्ये (बेडच्या उपलब्धतेनुसार) बेडसाठी मदत
ऑक्सिजन मशीन उपलब्ध

कोण दाखल होऊ शकते?
एचआरसीटी स्कोअर 7 पेक्षा कमी आहे.
डॉक्टरांनी मंजूर केलेले सर्व ब्लड पॅरामीटर्स
SP02 94 पेक्षा जास्त
6 मिनिटे चालण्याची चाचणी निगेटिव्ह 
वय 55 पेक्षा कमी कन्सेन्टवर स्वाक्षरी