hotel

esahas.com

कजाकिस्तानच्या व्यक्तीचा सातार्‍यातील हॉटेलमध्ये मृत्यू

कजाकिस्तान या देशातून आलेल्या एका व्यक्तीचा सातार्‍यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी समोर आली. आलेकक्षी पोडवालणी वय 39, राहणार करांगडा, कजाकिस्तान असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

esahas.com

हॉटेलचालकास मारहाण

सैदापूर ता. सातारा येथे एका हॉटेलचालकास डोक्यात दगड मारुन जखमी केले. याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

कास परिसरातील बांधकाम नियमितीचा आदेश म्हणजे बलात्कार करणार्‍याला नवरा मानून घेयला लावणं ?

सातारा जिल्ह्यातील कास पठार आणि परिसर हा वर्ल्ड हेरिटेज इको सेन्सिटिव्ह झोन असून याठिकाणी परवानगी शिवाय काही करता येत नाही याठिकाणी बांधकाम करण्यास बंदी असताना देखील , स्थानिकांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करून इथल्या जमिदाराला रखवालदार करुन , या ठिकाणी अनेक धनदांडग्यांनी अनेक बेकायदेशीर बांधकामे उभी केली  , ही बांधकामे करताना धनदांडग्यांनी प्रशासकीय यंत्रणेला हाताश...

esahas.com

हॉटेलमधील नोकराने लांबवला 31 हजारांचा मुद्देमाल

हॉटेलमधील नोकराने 31 हजारांचा मुद्देमाल लांबवल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

कास परिसरातील हॉटेलवर महसूल विभागाची कारवाई

जागतिक वारसा स्थळ लाभलेल्या कास पठार परिसरातील अतिक्रमण केलेल्या हॉटेलवर महसूल विभागाने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. मात्र ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली. कारवाईमध्ये पाच हॉटेल सील करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाई संदर्भात तहसीलदारांनी कारवाईचा भाग म्हणून अधिक बोलण्यास स्पष्ट नकार दिला.

esahas.com

हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे, ता. कराड गावच्या हद्दीत आपलं गांव मनपसंद फुडमॉल या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबलेल्या एका कुटुंबाची ७ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी हॉटेल मालक यांनी तात्काळ पोलिस अधिकारी यांच्याशी संपर्क साधून संबंधित कुटुंबियांच्या स्वाधीन केल्याने कुटुंबियांनी हॉटेल मालक यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आभार मानले आहेत.

esahas.com

सदर बझार येथील बीफ हॉटेलच्या विरोधात नागरिक आक्रमक

सातारा शहरातील सदर बझार येथील बिस्मिल्लाह आणि मदिना या दोन हॉटेलमध्ये बीफ विक्री केली जाते. गेल्या महिन्यात सातारा नगर पालिकेने कारवाई करत ही दोन्ही हॉटेल सील केली होती. सातारा नगरपालिकेने अटी- शर्तीचे नियम घालून ही हॉटेल संबंधितांकडून लेखी लिहून घेत पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. या बीफ हाॅटेल विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झालेले आहेत.

esahas.com

कास मार्गावरील हाॅटेलवर छापा

जगभरात ऐतिहासिक ठेवा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कास येथील एका रिसॉर्टवर छापा टाकून पोलिसांनी कॉलगर्ल्स पुरवणाऱ्या एकाला ताब्यात घेत रिसॉर्ट मालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिसांना देहविक्री करणाऱ्या दोन महिलांची सुटका करण्यात यश आले आहे.

esahas.com

वाढे फाटा येथील अतिक्रमण प्रकरणी ‘हॉटेल जांभळे बंधू’च्या मालकावर कारवाई करा!

सातारा-लोणंद मार्गावर असणार्‍या वाढे फाटा येथील ‘हॉटेल जांभळे बंधू’च्या मालकावर कारवाई करण्यात येवून हे अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

esahas.com

जे हॉटेल, रेस्टॉरंट नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर पोलीस विभागाने कारवाई करावी

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे जे नागरिक पालन करीत नाहीत अशांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर  हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. जे हॉटेल, रेस्टॉरंट नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर पोलीस विभागाने कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.

esahas.com

वाढे येथे हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण; सहाजणांवर गुन्हा

सातारा तालुक्यातील वाढे गावच्या हद्दीत एका व्यावसायिकाच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून त्याला जखमी करत खिशातील अठरा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेवून जीवे मारण्याची धमकी देण्याची तसेच ही भांडणे सोडवायला गेलेल्या एका हॉटेल मॅनेजरच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून जखमी करण्याची घटना बुधवार, दि. २२ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

महाबळेश्‍वरमधील हॉटेल व्यावसायिकास मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा

जावली तालुक्यातील गडी येथील मित्राकडे आलेल्या धारदेव, ता. महाबळेश्‍वर येथील एका हॉटेल व्यावसायिकास माऊंटन व्हिला रो हाऊस येथे रात्रीच्या वेळेस अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शाम मालुसरे नावाच्या व्यक्तीसह अन्य तीन अनोळखींवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

पाटील हॉस्पिटल, कोरेगाव व हॉटेल राधिका पॅलेसचे सातार्‍यात पहिले प्रायव्हेट कोरोना केअर सेंटर सुरू 

सातारा : आज संपूर्ण जग करोनाच्या विळख्यात सापडले आहे. सातारामध्येही कोरोना कहर वाढला आहे. अशाप्रसंगी कोरोनाग्रस्त पेशंटला हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध होत नाही. सातारकरांची गरज ओळखून सातारकरांच्या सेवेकरिता हॉटेल रधिका पॅलेसमध्ये पाटील हॉस्पिटल प्रा. लि. कोरेगाव यांच्या सहकार्याने कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. ज्या पेशंट्सची ऑक्सिजन लेवल 94 पेक्षा जास्त आहे व वय दहा ते साठ ...