sports

मृत्यू वाढले : कोरोनामुळे 35 जणांचा बळी

जिल्ह्यात दिवसभरात 973 बाधित : एकूण रुग्णसंख्या 26,449

जिल्ह्यात बाधितांचे आकडे वाढण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. दररोज सुमारे 25 ते 35 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे होत असल्यामुळे सातारा जिल्हावासीयांच्या काळजीत भर पडली आहे. मंगळवारीदेखील 35 रुग्णांचा उपचाराम्यान मृत्यू झाला तर 973 जण बाधित झाले.

सातारा : जिल्ह्यात बाधितांचे आकडे वाढण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. दररोज सुमारे 25 ते 35 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे होत असल्यामुळे सातारा जिल्हावासीयांच्या काळजीत भर पडली आहे. मंगळवारीदेखील 35 रुग्णांचा उपचाराम्यान मृत्यू झाला तर 973 जण बाधित झाले.

930 जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 930  जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून, 883 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

883 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 20, उपजिल्हा रुग्णालय, कराड 44, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 53, कोरेगाव 80, वाई 126, खंडाळा 73, रायगाव 80, पानमळेवाडी 118, महाबळेश्‍वर 85, खावली 33 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 171 अशा एकूण 883 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.