sports

जिल्ह्यात दिवसभरात 898 कोरोनाबाधित

सोमवारी 31 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 25,476 

जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढतच असून, सोमवारी दिवसभरात 31 रुग्णांचा मृत्यू झाला तर 898 जण कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 25,476 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढतच असून, सोमवारी दिवसभरात 31 रुग्णांचा मृत्यू झाला तर 898 जण कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 25,476 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

जिल्ह्यात आणखी 761 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 761 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून, 1209 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

1209 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय, कराड 31, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 68, कोरेगाव 61, वाई 160, खंडाळा 147, रायगाव 121, पानमळेवाडी 80, मायणी 214, महाबळेश्‍वर 49, पाटण 41, दहिवडी 50, तळमावले 25 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 246 अशा एकूण  1209 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.