जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट; दिवसभरात उच्चांकी 1086 बाधित
25 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू : एकूण रुग्णसंख्या 23,949
जिल्हा अत्यंत बिकट परिस्थितीमधून जात असून, कोरोनाचे संकट आणखी उग्र रूप धारण करू लागले आहे. जिल्ह्यात शनिवारी 25 जणांचा मृत्यू झाला तर 1086 जण बाधित सापडल्यामुळे सातारकरांची चिंता आणखी वाढली आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 23,949 इतकी झाली आहे.
सातारा : जिल्हा अत्यंत बिकट परिस्थितीमधून जात असून, कोरोनाचे संकट आणखी उग्र रूप धारण करू लागले आहे. जिल्ह्यात शनिवारी 25 जणांचा मृत्यू झाला तर 1086 जण बाधित सापडल्यामुळे सातारकरांची चिंता आणखी वाढली आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 23,949 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात आणखी 630 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 630 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून, 1124 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
1124 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 66, उपजिल्हा रुग्णालय, कराड 22, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 74, कोरेगाव 131, वाई 153, खंडाळा 55, रायगाव 88, पानमळेवाडी 47, मायणी 162, महाबळेश्वर 50, पाटण 12, दहिवडी 38, खावली 35, तळमावले 33 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 158 अशा एकूण 1124 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.


