फलटण -पुसेगाव रस्त्यावर एक 15 ते 16 वर्षीय मुलगी मध्यरात्री 3 ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास पाठीवर सॅक लावून एकटीच निघाली होती. बारामतीचे पत्रकार मच्छिंद्र टिंगरे यांनी मोबाईलवर व्हिडिओ शुटिंग घेत तिची विचारपूस करुन तिला एका वस्तीवरील घरी थांबवले. मात्र, ती कोण होती व तिचे पुढे काय झाले, अशा अनेक प्रश्नांची मालिका शनिवारी दुपारी समोर आली पण अल्पवयीन मुलीचे हे धाडस जीवेघेणेही ठरु शकले असते.
सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सात येथील ढोर गल्लीमध्ये सांडपाण्याच्या गटाराचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाची वर्कऑर्डर नसतानासुद्धा हे काम झाल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष अशोक तपासे यांचे चिरंजीव अनिकेत तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला. ढोर गल्ली येथे झालेल्या बेकायदेशीर कामकाजाचा पर्दाफाश त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
सातारा शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
खेड, ता. सातारा येथील गौरीशंकर हाईट मधील फ्लॅट फोडून चोरट्यांनी 1 लाख 59 हजाराचे दागिने चोरून नेल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
शहरातील एका भागात अल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलाने घरी बोलवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने त्याच्याविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे येथे प्लॉट खरेदीसाठी माहेरहून 8 लाख रूपये घेवून येण्याच्या करणावरून विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करणार्या पती, सासु-सासरे, नणंद यांच्याविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वर्ये, ता. सातारा गावच्या हद्दीत हायवे रोडलगत असणार्या मानस हॉटेलमध्ये काही नागरिक व हॉटेलचे कर्मचारी विनामास्क फिरताना आढळून आले. मास्क घालणे बंधनकारक करूनही नियमांचे उल्लघंन केल्याने तहसिलदार कार्यालयातील मंडल अधिकारी प्रभाकर कुलकर्णी यांनी दोघांविरूद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
निनाम पाडळी, ता. सातारा येथे बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या दोघांवर वन विभागाने गुन्हे दाखल केले आहे. यांच्याकडून ट्रॅक्टरट्रॉली, दोन कटर मशीन, आणि तोडलेली वृक्षाची लाकडे असा एकूण अंदाजे साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गजवडी, ता. सातारा येथे अंगणात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याने त्यामध्ये शेळीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान परिसरात मोठी भिंत असल्यामुळे बिबट्याला मृत्यू झालेल्या शेळीला घेऊन जाता न आल्याने ही घटना उघडकीस आली.
येथील औद्योगिक वसाहत परिसरामध्ये एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.