शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून टनामागे 10 रुपये कपात करून तो निधी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला देण्याचा जीआर राज्य शासनाने काढला आहे. परंतु, राज्यात अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारथी व आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकार पैसे देते. मग ऊसतोड महामंडळाला शेतकऱ्यांनी का पैसे द्यावेत? हा प्रश्न आहे.
वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळे महाराष्ट्रात ११ अकरा ते सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी रविवारी रात्रीपासून सातारा शहरात अत्यंत कडकपणे करण्यात आली.
ओमायक्रॅानच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली जाहीर केली असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाबळेश्वरमधील सर्व टुरिस्ट पाॅईंट बंद करण्यात आले असून अम्युजमेंट पार्क, वेण्णा लेक बोटिंग पाॅईंट सुद्धा बंद करण्यात आले आहेत. लाॅजिंग मात्र 100 टक्के क्षमतेने सुरू राहणार असून रेस्टाॅरंट 50 टक्के क्षमतेने सुरू असल्याची माहिती महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली आहे.
दुष्काळी भागात नैसर्गिक वरदान लाभलेल्या येरळवाडी धरण परिसरात परदेशी पक्ष्यांच्या आगमनाने पर्यटक व अभ्यासकांची वाढ झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यास वाव असला तरी स्थानिक वन विभागाचा दुर्लक्षितपणा व अभाव यामुळे खटाव तालुक्यातील वन विभागाच संशयाच्या पिंजऱ्यात अडकला आहे.त्याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी अशी मागणी येरळवाडी सह खटाव तालुक्यातील वृक्षप्रेमींनी केली आहे.
सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली.
सातारा : सह्याद्री देवराई संस्थेला पोलीस दलाच्या जागेत झाडे लावण्याची परवानगी नाकारल्याची बातमी सर्वत्र फिरत असताना सरकार खडबडून जागं झालं आहे. सह्याद्री देवराई संस्थेचा उपक्रम अतिशय चांगला असून याबाबतच्या अडचणी सोडवल्या जातील, असं आश्वासन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिलं आहे.पोलीस अधीक्षकांची परवानगी असताना तसेच विभागीय आयुक्तांचा होकार असताना एवढंच नाही तर उप...
ग्वाल्हेर-बेंगळूर आशियाई महामार्गावर वळसे (ता.सातारा) येथे दुचाकीला झालेल्या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाला. रविवारी सकाळी हा अपघात झाला.
सातारा शहरातील तामजाई नगर येथील शिवामृत अपार्टमेंट मध्ये रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका फ्लॅटला भीषण आग लागली. यामध्ये फ्लॅटमधील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे. विश्वनाथ धनावडे यांच्या मालकीचा हा फ्लॅट असून काल हे कुटुंब गावी गेले आहे.
पत्रकारांनी अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन आदी. आपत्तीसह कोरोनासारख्या महामारीत आपला जीव धोक्यात घालून काम केले. परंतू, राज्यात पत्रकारांवर हल्ले होण्याच्या घटनाही घडत असून दोन वर्षात त्यासंबंधीचे कायदे अधिक कडक करण्यात आले आहेत.
मलकापूर नगरपालिका कार्यक्षेत्रामधील 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोविड-19 प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी 8 रोजी येथील नुतन मराठी प्राथमिक शाळेत मलकापूर नगरपालिका व काले प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडून संयुक्तरित्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.