maharashtra

येरळवाडीला पर्यटनाला मोठा वाव पण, वन विभागाच्या प्रयत्नाचा अभाव


Yeralwadi is a big destination for tourism but lack of efforts of forest department
दुष्काळी भागात नैसर्गिक वरदान लाभलेल्या येरळवाडी धरण परिसरात परदेशी पक्ष्यांच्या आगमनाने पर्यटक व अभ्यासकांची वाढ झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यास वाव असला तरी स्थानिक वन विभागाचा दुर्लक्षितपणा व अभाव यामुळे खटाव तालुक्यातील वन विभागाच संशयाच्या पिंजऱ्यात अडकला आहे.त्याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी अशी मागणी येरळवाडी सह खटाव तालुक्यातील वृक्षप्रेमींनी केली आहे.

वडूज : दुष्काळी भागात नैसर्गिक वरदान लाभलेल्या येरळवाडी धरण परिसरात परदेशी पक्ष्यांच्या आगमनाने पर्यटक व अभ्यासकांची वाढ झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यास वाव असला तरी स्थानिक वन विभागाचा दुर्लक्षितपणा व अभाव यामुळे खटाव तालुक्यातील वन विभागाच संशयाच्या पिंजऱ्यात अडकला आहे.त्याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी अशी मागणी येरळवाडी सह खटाव तालुक्यातील वृक्षप्रेमींनी केली आहे.
खटाव तालुक्यातील दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात वन विभागाचे क्षेत्र आहे. इंग्रज काळापासून या भागात वनराई बहरली होती. त्यामुळे वन संपदा जतन करण्यासाठी इंग्रज सरकारने खूप मोठी कामगिरी बजावली आहे. वन प्राणी, वन्य जीव व वृक्षाची तसेच नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गोष्टींचा विचार करून त्याची निगा राखण्यासाठी कडक कायदे केले आहेत. त्याचाच विसर पडून आता वन्य जंगल लुबडणाऱ्या काही ठेकेदार मंडळी वन विभागाच्या कार्यालयात वावरताना दिसत आहेत. याची वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांनी गोपनीयता राखून चौकशी केल्यास बरीच प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
येरळा धरण आंदोलनाच्या वेळी काही ग्रामस्थांनी वन विभागाच्या कारभाराबाबत ताशेरे ओढले होते, येरळवाडी धरण परिसरात पर्यटन विकास व वाढीसाठी वन विभागाने काय केले? असा प्रश्न काही ग्रामस्थ व पर्यटकांना पडला आहे. काही ठराविक ठेकेदारांच्या मर्जी साठी वन विभाग कार्य करीत असेल तर सदर परिसरातील देखभाल व कायदेशीर नियम पाळण्याची जबाबदारी स्थानिक वन समित्या कडे सुपूर्द करून संबंधितांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दयावी अशी ही मागणी करण्यात येत आहे. येथील अधिकारी वर्ग चांगला असला तरी त्यांना मर्यादा असल्याचे ही काहींनी मत व्यक्त केले आहे.
गेली अनेक दिवसांपासून परदेशी पक्षांचे आगमन झाले पण, वन विभागाकडून कोणत्याही प्रकारची सोय केली नाही. येरळवाडी धरण परिसरात पक्षांच्या बाबत मार्गदर्शक व माहिती फलक नाही, वन विभागाचे नोंद पुस्तक नाही,आवश्यक सुविधांचा अभाव आहे. ग्रामपंचायत येरळवाडी एकाकीपणे पर्यटन विकास व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण, वन विभागाची साथ मिळत नाही, वन विभागाने गांभीर्याने लक्ष वेधले तर रोजगार उपलब्ध होईल. नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी लोकप्रतिनिधी सुध्दा विशेष निधीची तरतूद करतील, असाही विश्वास येरळवाडी सरपंच योगेश जाधव, सदाशिवराव बागल, अनिल चव्हाण, प्रविण बागल, अक्षय जाधव, बाबासाहेब बागल, मधुसूदन जाधव यांनी व्यक्त केला आहे.