maharashtra

साताऱ्यात रात्रीची संचारबंदी लागू

वाहनचालकांची कसून चौकशी

Night curfew imposed in Satara
वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळे महाराष्ट्रात ११ अकरा ते सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी रविवारी रात्रीपासून सातारा शहरात अत्यंत कडकपणे करण्यात आली.

सातारा : वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळे महाराष्ट्रात ११ अकरा ते सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी रविवारी रात्रीपासून सातारा शहरात अत्यंत कडकपणे करण्यात आली.
गृहमंत्रालयाने रविवारीपासून राज्यभरात संचारबंदी लागू केल्यानंतर सातारा शहरात रात्री अकरानंतर बॉम्बे रेस्टॉरंट, पोवई नाका, राजवाडा, वाढे फाटा, मोळाचा ओढा, बोगदा परिसर येथे रात्री ११ नंतर दुचाकी चारचाकी वाहने थांबवून चालकांची चौकशी केली. विनाकारण रात्री फिरणाऱ्या वाहनचालकांना कडक शब्दात सूचना करून संचारबंदीची माहिती दिली. रात्री ११ नंतर  रस्त्यावर वाहने घेऊन आल्यास त्यांची वाहने जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिस दलाच्यावतीने देण्यात आला. आहे.
मास्क न वापरणाऱ्या दोघांवर गुन्हे
सातारा येथील शाहूपुरी चौकात फिश पॉइंट या दुकानात मास्क न वापरणाऱ्या अजिंक्य गणेश बावधने, वय १९ आणि विक्रांत अशोक पवार, वय ३६ दोघेही रा. शाहूपुरी, सातारा यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.