सातारा शहरातील तामजाई नगर येथील शिवामृत अपार्टमेंट मध्ये रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका फ्लॅटला भीषण आग लागली. यामध्ये फ्लॅटमधील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे. विश्वनाथ धनावडे यांच्या मालकीचा हा फ्लॅट असून काल हे कुटुंब गावी गेले आहे.
सातारा : सातारा शहरातील तामजाई नगर येथील शिवामृत अपार्टमेंट मध्ये रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका फ्लॅटला भीषण आग लागली. यामध्ये फ्लॅटमधील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे. विश्वनाथ धनावडे यांच्या मालकीचा हा फ्लॅट असून काल हे कुटुंब गावी गेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरातील तामजाई नगर मधील श्री नगरी येथील शिवामृत अपार्टमेंटमध्ये विश्वनाथ धनावडे यांच्या मालकीच्या असलेल्या फ्लॅटला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. फ्लॅटमधून आगीचे लोट बाहेर येऊ लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान फ्लॅटच्या शेजारी असलेल्या रहिवाशानी तत्काळ सातारा पालिकेच्या अग्निशामक दलास तसेच पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस व अग्निशामक दलाचे कर्मचारी तत्काळ या ठिकाणी दाखल झाले.
सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लागलेली आग चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना विझवण्यात यश आले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी फ्लॅट मधील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


