पुणे येथे प्लॉट खरेदीसाठी माहेरहून 8 लाख रूपये घेवून येण्याच्या करणावरून विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करणार्या पती, सासु-सासरे, नणंद यांच्याविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : पुणे येथे प्लॉट खरेदीसाठी माहेरहून 8 लाख रूपये घेवून येण्याच्या करणावरून विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करणार्या पती, सासु-सासरे, नणंद यांच्याविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी, तस्नीम अरमान शेख (वय 27, रा. शाहूपुरी) यांचा विवाह अरमान शेख यांच्याशी झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर पती अरमान, सासु आयशा शेख, सासरे रफिक शेख, नणंद सिमरन शेख यांनी शिवीगाळ करून दमदाटी करायला सुरूवात केली. माहेरहून पुणे येथे घर घेण्यासाठी 8 लाख रूपये घेवून येण्यास सांगितले. याला तस्नीम हिने नकार दिल्याने तिचा शारिरीक व मानसिक छळ केल्याने या सर्वाविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.