maharashtra

घरफोडी करून चोरट्यांनी चोरले 1 लाख 59 हजारांचे दागिने


Thieves broke into the house and stole jewelery worth Rs 1.59 lakh
खेड, ता. सातारा येथील गौरीशंकर हाईट मधील फ्लॅट फोडून चोरट्यांनी 1 लाख 59 हजाराचे दागिने चोरून नेल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

सातारा : खेड, ता. सातारा येथील गौरीशंकर हाईट मधील फ्लॅट फोडून चोरट्यांनी 1 लाख 59 हजाराचे दागिने चोरून नेल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गौरीशंकर हाईट मध्ये राहत असलेले अमोल अरूण कांबळे (वय 34) हे बाहेरगावी गेल्याने दि. 6 रोजी 11 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. फ्लॅटमध्ये ठेवलेले सोन्याचे दोन मनीमंगळसूत्र, अंगठी, कर्णफुले, चांदीचा छल्ला, मनगटी घड्याळ असा एकून 1 लाख 59 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या चोरीचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. कदम अधिक तपास करत आहेत.