सातारा शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सातारा : सातारा शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करंजे येथील काळेगल्ली ते झेंडा चौक या रस्त्याने दि. 6 रोजी 6 वाजण्याच्या सुमारास पुनम सुनिल जाधव (वय 29) या चालत निघाल्या होत्या. यावेळी मोटार सायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने पुनम यांच्या गळ्यातील पावनेदोन तोळ्याचे 70 हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिस्कावून नेले.
दुसरी घटना सदरबाझार येथील कांगा कॉलनीत घडली. याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कांगा कॉलनी येथील रस्त्यावरून उषा दादासाहेब सरकाळे (वय 56) या चालत निघाल्या होत्या. यावेळी दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांचे 40 हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. या एकाच दिवशी घडलेल्या घटना आहेत. यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलीसांनी रात्रीसह दिवसाही पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी होत आहे. या दोन्ही मंगळसुत्र चोरट्यांविरूद्ध सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस चोरट्यांचा तपास करत आहेत.


