maharashtra

अल्पवयीन मुलाकडून शहरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग


Harassment of a minor girl in the city by a minor boy
शहरातील एका भागात अल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलाने घरी बोलवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने त्याच्याविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : शहरातील एका भागात अल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलाने घरी बोलवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने त्याच्याविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील एका भागात राहत असलेली अल्पवयीन मुलगी हिला अल्पवयीन मुलाने दि. 2 रोजी 10 वाजण्याच्या सुमारास घरी बोलवले. यावेळी तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या वर्तनाची माहिती मुलीने तिच्या आईला दिली. आईने त्याच्याविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप त्याला ताब्यात घेण्यात आलेले नाही. या गुह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहेत.