वर्ये, ता. सातारा गावच्या हद्दीत हायवे रोडलगत असणार्या मानस हॉटेलमध्ये काही नागरिक व हॉटेलचे कर्मचारी विनामास्क फिरताना आढळून आले. मास्क घालणे बंधनकारक करूनही नियमांचे उल्लघंन केल्याने तहसिलदार कार्यालयातील मंडल अधिकारी प्रभाकर कुलकर्णी यांनी दोघांविरूद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सातारा : वर्ये, ता. सातारा गावच्या हद्दीत हायवे रोडलगत असणार्या मानस हॉटेलमध्ये काही नागरिक व हॉटेलचे कर्मचारी विनामास्क फिरताना आढळून आले. मास्क घालणे बंधनकारक करूनही नियमांचे उल्लघंन केल्याने तहसिलदार कार्यालयातील मंडल अधिकारी प्रभाकर कुलकर्णी यांनी दोघांविरूद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी, मानस हॉटेलमध्ये दि. 7 रोजी 8.30 वाजण्याच्या सुमारास काही नागरिक व हॉटेलमधील मॅनेजर हे विनामास्क फिरताना तहसिलदार कार्यालयातील मंडल अधिकारी प्रभाकर कुलकर्णी यांना आढळून आले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मास्क घालणे बंधनकारक असताना संतोष रामचंद्र ढेबे (रा. वाढे फाटा ता. सातारा), संजय एकनाथ क्षीरसागर (वय 50, रा. सदरबझार, सातारा) यांनी नियमांचे उल्लघंन केले. यामुळे त्यांच्या विरूद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या गन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार बागवान करत आहेत.


