actionagainstbothforviolatingtheorder

esahas.com

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई

वर्ये, ता. सातारा गावच्या हद्दीत हायवे रोडलगत असणार्‍या मानस हॉटेलमध्ये काही नागरिक व हॉटेलचे कर्मचारी विनामास्क फिरताना आढळून आले. मास्क घालणे बंधनकारक करूनही नियमांचे उल्लघंन केल्याने तहसिलदार कार्यालयातील मंडल अधिकारी प्रभाकर कुलकर्णी यांनी दोघांविरूद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.