येथील औद्योगिक वसाहत परिसरामध्ये एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : येथील औद्योगिक वसाहत परिसरामध्ये एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित युवती सातारा येथे औद्योगिक वसाहत परिसरात राहते. मंगळवार, दि. ४ रोजी दुपारी घरी असतान तिच्या मोबाईलवर एका अज्ञाताने व्हिडीओ कॉल करुन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी तिने गुरुवार, दि. ६ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर करत आहेत.


