खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील शिरवळ-लोंणद रस्त्यावर असणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालय परिसरात जिवंत मांडूळ विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना सातारा वन विभागाने ताब्यात घेतले आहे.
सातारा येथील गोडोली परिसरातून वीस हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा येथील अमरलक्ष्मी चौकातील मंगलमूर्ती कार्यालयासमोर रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीतून अडीच हजार रुपयांचे डिझेल चोरीला गेले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यापैकी निरंजन गणेश भोईटे याला अटक करण्यात आली असून अन्य एकाचा शोध सुरु आहे.
सातारा तालुक्यातील ठोसेघर परिसरात पळसवडे येथे बुधवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. पळसवडेच्या वनसमितीचे अध्यक्ष असलेल्या माजी सरपंचाने वनविभागातील महिला वनरक्षकालाच गंभीर स्वरुपाची मारहाण केली. या घटनेत ती महिला वनरक्षक गंभीर जखमी झाली असून ती गर्भवती असताना देखील तिला मारहाण करणार्या माजी सरपंचाविषयी समाजात तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
महाविकास आघाडी सरकारने सुधारित केलेल्या विद्यापीठ कायद्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची शक्यता आहे. तसेच विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप होऊ नये, यासाठी हा कायदा मागे घ्यावा. अन्यथा, राज्यभरात विद्यापीठ बचाव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर यांनी दिला.
देशाचे प्रधानमंत्री हे आदरणीय व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा भाजपने विपर्यास केला. खरेतर, पटोले यांनी पंतप्रधानांचे नाव वापरलेले नाही. केवळ त्यांना बदनाम करण्यासाठी भाजपने अर्थाचा अनर्थ केला असून त्यांची जनमाणसातील प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न राज्यातील भाजप करत आहे.
दहिवडी पाटण खंडाळा लोणंद या चार नगरपंचायतीत विरोधकांना धूळ चारत राष्ट्रवादीने आपली पाळेमुळे घट्ट रोवली. कोरेगाव नगरपंचायत मात्र शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांच्या गटाने राष्ट्रवादीच्या आ. शशिकांत शिंदे यांच्या गटाला धूळ चारत 13 पैकी नऊ जागांवर बाजी मारली. वडूजमध्ये भाजपचे आ. जयकुमार गोरे यांच्या पॅनेलने आपले वर्चस्व सिद्ध केले, मात्र तरीही तेथील चार अपक्ष उमेदवारांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलने १३ जागांवर विजय मिळवत परिवर्तन घडवले असून, एक हाती सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला केवळ ४ जागांंवर समाधान मानावे लागले आहे. कमी जागा लढवत असलेल्या कॉंग्रेसचे मात्र पानिपत झाले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे.
रेठरे खुर्द ता. कराड गावाने प्रतिकूल परिस्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांना मोलाची साथ दिली. याची जाण ठेवून आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गावात विकास करताना राजकारण केले नाही. ज्या पद्धतीने गावाने त्यांना साथ केली. तशीच एकजूट दाखवून गावातील विकासकामे करावीत, असे मत युवा नेते इंद्रजित चव्हाण यांनी व्यक्त केले.
रोमनवाडी (येराड) ता. पाटण येथे सख्खा बहिण-भावाचा शेततळ्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी १७ रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरा संबंधित बहिण-भावाचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. या घटनेने रोमनवाडी, येराडसह तालुक्यात शोककळा पसरली आहे.