maharashtra

खा. श्रीनिवास पाटील कोरोना पॉझिटिव्ह


सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीनिवास पाटील यांचा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आहे. त्याबाबत त्यांनी स्वतः ट्विटद्वारे सांगितले असून दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, सुरक्षित रहा, असे आवाहनही त्यांनी ट्विटद्वारे केले आहे.

कराड : सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीनिवास पाटील यांचा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आहे. त्याबाबत त्यांनी स्वतः ट्विटद्वारे सांगितले असून दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, सुरक्षित रहा, असे आवाहनही त्यांनी ट्विटद्वारे केले आहे.
खासदार श्रीनिवास पाटील हे नेहमी जनमानसात रमणारे नेते आहेत. त्यामुळे ते एक लोकप्रिय खासदार असून दररोज विविध कार्यक्रमानिमित्त ते लोकांमध्ये मिसळून सहभागी होतात. गेल्या चार दिवसात खा.पाटील यांनी सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती.
दरम्यान, आज त्यांना किरकोळ त्रास झाल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्याने येथील एका रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. परंतु, त्यांची प्रकृती चांगली असून काळजी करण्याचे कोणतेही कारण  नसल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत खा. श्रीनिवास पाटील यांनी स्वतः ट्विट केले आहे. यामध्ये 'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते उपचार सुरु आहेत. कृपया काळजी करु नये. तसेच गेल्या दोन-तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी.
त्याचबरोबर सर्वांनी काळजी घ्या, सुरक्षित रहा, असेही आवाहन त्यांनी या खा. पाटील यांनी ट्विटद्वारे केले आहे.