सातारा येथील अमरलक्ष्मी चौकातील मंगलमूर्ती कार्यालयासमोर रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीतून अडीच हजार रुपयांचे डिझेल चोरीला गेले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यापैकी निरंजन गणेश भोईटे याला अटक करण्यात आली असून अन्य एकाचा शोध सुरु आहे.
सातारा : सातारा येथील अमरलक्ष्मी चौकातील मंगलमूर्ती कार्यालयासमोर रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीतून अडीच हजार रुपयांचे डिझेल चोरीला गेले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यापैकी निरंजन गणेश भोईटे याला अटक करण्यात आली असून अन्य एकाचा शोध सुरु आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, प्रवीण रामचंद्र मोरे (वय ४३, रा. श्रीदत्त व्हीला अपार्टमेंट, एस / २, शिवनगर, संभाजीनगर, सातारा) हे ट्रान्सपोर्ट व्यवसायिक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी त्यांचा लेलंड कंपनीचा ट्रक (एमएच ११ - एएल ५३४५) हा घराशेजारी पार्क केला होता. मात्र, दि. १८ जानेवारी रोजी निरंजन भोईटे (वय २७, रा. पैढ्याचा भैरोबा, शाहूपुरी, सातारा) व अन्य एक अनोळखी इसम असे दोघेजण नंबर नसलेल्या दुचाकीवरुन आले आणि त्यांनी ट्रकच्या टाकीतून अडीच हजार रुपयांचे २५ ते ३0 लिटर डिझेल चोरुन नेले.
याबाबतची तक्रार प्रवीण यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर निरंजन भोईटेवर गुन्हा दाखल झाला असून दुसऱ्या संशयिताचा शोध सुरु आहे. निरंजन याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक इंगवले करत आहेत.


