dieselstolenfromatrucktank

esahas.com

ट्रकच्या टाकीतून अडीच हजाराच्या डिझेलची चोरी

सातारा येथील अमरलक्ष्मी चौकातील मंगलमूर्ती कार्यालयासमोर रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीतून अडीच हजार रुपयांचे डिझेल चोरीला गेले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यापैकी निरंजन गणेश भोईटे याला अटक करण्यात आली असून अन्य एकाचा शोध सुरु आहे.