Satara

esahas.com

रेठरे खुर्दच्या विकासात पृथ्वीराज चव्हाण यांची मोलाची साथ

रेठरे खुर्द ता. कराड गावाने प्रतिकूल परिस्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांना मोलाची साथ दिली. याची जाण ठेवून आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गावात विकास करताना राजकारण केले नाही. ज्या पद्धतीने गावाने त्यांना साथ केली. तशीच एकजूट दाखवून गावातील विकासकामे करावीत, असे मत युवा नेते इंद्रजित चव्हाण यांनी व्यक्त केले.

esahas.com

रोमनवाडीत शेततळ्यामध्ये बुडून बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू

रोमनवाडी (येराड) ता. पाटण येथे सख्खा बहिण-भावाचा शेततळ्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी १७ रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास  ही घटना घडली. रात्री उशिरा संबंधित बहिण-भावाचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. या घटनेने रोमनवाडी, येराडसह तालुक्यात शोककळा पसरली आहे.

esahas.com

प्रसूतीनंतर वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने विवाहितेचा मृत्यू

केर, ता. पाटण येथील विवाहितेचा प्रसूतीनंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. या संतापजनक घटनेने पाटण तालुक्यातील आरोग्य सेवेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, या हलगर्जीपणा जबाबदार असेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

esahas.com

दुचाकी चोरटा जेरबंद

पाचगणीमधून दुचाकी गाडी चोरून तिचा रंग बदलणाऱ्या वाई येथील सिद्धेश नितीन तोरसकर या दुचाकी चोरट्यास पाचगणी पोलिसांनी जेरबंद केले.

esahas.com

आनेवाडी टोलनाक्यावर राडा

पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर फास्ट टॅग स्कॅन झाल्याच्या कारणावरुन सोमवारी मध्यरात्री जोरदार राडा झाला. यावेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी नालासोपारा येथील वाहनचालकास मारहाण केली. याप्रकरणी टोलनाका कर्मचाऱ्यासह वाई तालुक्यातील विरमाडे येथील दहा जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

esahas.com

सहा नगरपंचायंतीसाठी जिल्ह्यात 80.49 टक्के मतदान

सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायती साठी मंगळवारी 80.49 टकके मतदान झाले. लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी या सहा नगरपंचायतीच्या 13818 मतदारांनी निवडणुकीच्या रिंगणातील 82 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद केले. या निवडणुकांचा निकाल बुधवारी दि. 19 रोजी लागणार असल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे.

esahas.com

गजवडी येथे अवैधरित्या लाकूड वाहतूक करणारे अटकेत

वनविभागाचे कर्मचारी रात्रगस्त घालत असताना मौजे गजवडी गावाच्या हद्दीत फणस, अकेशिया झाडांच्या लाकडांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि क्रेनवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सांगली व सातारा जिल्ह्यातील दोघांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.

esahas.com

किल्ले वसंतगडावर बुरुजाचा दुर्गार्पण सोहळा संपन्न

किल्ले वसंतगडावरील पश्चिम दरवाज्याच्या बाजूकडील बुरुजासह तटबंदीचा काही भाग अतिवृष्टीमुळे ढासळला होता. त्याची डागडुजी व पुनर्बांधणी करून संवर्धन करण्याचा संकल्प सह्याद्री प्रतिष्ठान व टीम वसंतगडच्या दुर्गसेवकांनी केला होता. तो संकल्प पूर्णत्वास नेत बुरुज, तटबंदीची पुनर्बांधणी पूर्ण करून नुकताच त्याचा दुर्गार्पण सोहळाही उत्साहात संपन्न झाला.

esahas.com

एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावले नगरसेवक वसंत लेवे

गेल्या दोन महिन्यापासून सातारा मध्यवर्ती आगाराच्या आवारात सुमारे 70 कर्मचार्‍यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक चणचणीची निकड लक्षात घेऊन नगरसेवक वसंत लेवे यांनी या कर्मचाऱ्यांना अन्नधान्य कीटचे वाटप केले. या कामासाठी लेवे यांनी पदरमोड करत तातडीची मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांनी लेवे यांना मनापासून धन्यवाद दिले.

esahas.com

जिल्हा उपनिबंधकांचा तुघलकी कारभार; जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आणि जिल्हाधिकार्‍यांनी 144 कलम जिल्ह्यात लागू केले असतानाही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी तुघलकी कारभार करीत कर्जदारांना आपल्या कार्यालयात बोलविण्याचा अजब फंडा अवलंबला आहे.