रेठरे खुर्दच्या विकासात पृथ्वीराज चव्हाण यांची मोलाची साथ
इंद्रजित चव्हाण : 28 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन
रेठरे खुर्द ता. कराड गावाने प्रतिकूल परिस्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांना मोलाची साथ दिली. याची जाण ठेवून आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गावात विकास करताना राजकारण केले नाही. ज्या पद्धतीने गावाने त्यांना साथ केली. तशीच एकजूट दाखवून गावातील विकासकामे करावीत, असे मत युवा नेते इंद्रजित चव्हाण यांनी व्यक्त केले.
कराड : रेठरे खुर्द ता. कराड गावाने प्रतिकूल परिस्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांना मोलाची साथ दिली. याची जाण ठेवून आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गावात विकास करताना राजकारण केले नाही. ज्या पद्धतीने गावाने त्यांना साथ केली. तशीच एकजूट दाखवून गावातील विकासकामे करावीत, असे मत युवा नेते इंद्रजित चव्हाण यांनी व्यक्त केले.
रेठरे खुर्द येथे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून व प्रयत्नातून मंजूर झालेल्या 28 लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन इंद्रजित चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मधुकर एटांबे होते.
यावेळी उपसरपंच चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मोहिते, सदानंद गुरव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष निवास जाधव, युवा नेते देवदास माने, दिग्विजय पाटील, आबा सूर्यवंशी, विनोद पाटील, दिलीप पाटील, ग्रामसेवक डी. एम. करचे, राम मोहिते, बापूसाहेब साळुंखे, संभाजी पाटील, शंकर पाटील, सुरेश पाटील, बजरंग साळुंखे, वसंत देसाई, भिमराव मोहिते, लाला नलवडे, क्षितिज नलवडे, विराज वाठारकर, अमोल रसाळ, सचिन खंडागळे, सागर काटकर, धनाजी जाधव, सुरेश जाधव, आमित नलवडे, मिलिंद बनसोडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, पृथ्वीराज बाबांच्या राजकीय वाटचालीत रेठरे खुर्द व या विभागाने चांगली साथ दिली आहे. विकासकामे करताना बाबा कधीच राजकारण मनात आणत नाहीत. त्यांच्याकडे विकासकामांचे प्रस्ताव आणल्यानंतर आलेला मतदार कोणत्या गटाचा आहे, हा विचार न ठेवता ते कार्यवाही करतात. रेठरे खुर्द गावाने बाबांना प्रतिकूल परिस्थितीत साथ दिली आहे. ग्रामस्थांनी ठेवलेले एकमत विकासकामांसाठी असेच राखावे व गावचा विकास साधावा.
शिवराज मोरे म्हणाले, पृथ्वीराज बाबांनी विधायक दृष्टी ठेवून कराड दक्षिणेचा कायापालट केला आहे. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून विकास करण्याचा त्यांचा मानस राहिला आहे. कृष्णाकाठच्या प्रत्येक गावात त्यांनी विकास केला आहे. रेठरे खुर्द गावासाठी मिळालेल्या निधीचा वापर करून विकासकामे पूर्ण करावीत. बापूसाहेब साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. सुरेश पाटील यांनी आभार मानले.