maharashtra

दुचाकी चोरटा जेरबंद


Two-wheeler thief arrested
पाचगणीमधून दुचाकी गाडी चोरून तिचा रंग बदलणाऱ्या वाई येथील सिद्धेश नितीन तोरसकर या दुचाकी चोरट्यास पाचगणी पोलिसांनी जेरबंद केले.

पाचगणी : पाचगणीमधून दुचाकी गाडी चोरून तिचा रंग बदलणाऱ्या वाई येथील सिद्धेश नितीन तोरसकर या दुचाकी चोरट्यास पाचगणी पोलिसांनी जेरबंद केले.
याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. १७ जुलै रोजी पाचगणी येथील हॉटेल पुरोहितचे मालक मेहुल किशोर पुरोहित यांची ५० हजार रुपये किमतीची लाल रंगाची सुझुकी एक्सीस मोटार सायकल निहाल बागवान यांच्या दुकानासमोरून चोरीला गेली होती. याची फिर्याद पुरोहित यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. या तपासा दरम्यान पाचगणी पोलिसांना वाई येथील लकी गॅरेज सिध्दनाथवाडी येथे संबंधित गाडी रंगकाम करण्यासाठी आलेली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक वाई येथे त्या गॅरेजमध्ये गेलं असता ती गाडी सिद्धेश नितीन तोरसकर (वय ३० रा. सिध्दनाथवाडी, वाई) याने आणल्याची समजले. त्यानुसार पोलिसांनी लगेच तोरसकर याला अटक केली.
पाचगणीमधील आणखी गाड्या या चोरट्याने चोरल्या आहेत का? याचा तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र कदम, जितेंद्र कांबळे, अविनाश बाबर, निलेश माने व त्यांचे सहकारी करीत आहेत.