पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर फास्ट टॅग स्कॅन झाल्याच्या कारणावरुन सोमवारी मध्यरात्री जोरदार राडा झाला. यावेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी नालासोपारा येथील वाहनचालकास मारहाण केली. याप्रकरणी टोलनाका कर्मचाऱ्यासह वाई तालुक्यातील विरमाडे येथील दहा जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर फास्ट टॅग स्कॅन झाल्याच्या कारणावरुन सोमवारी मध्यरात्री जोरदार राडा झाला. यावेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी नालासोपारा येथील वाहनचालकास मारहाण केली. याप्रकरणी टोलनाका कर्मचाऱ्यासह वाई तालुक्यातील विरमाडे येथील दहा जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, नालासोपारा येथील मयुरेश भाउसाहेब शेलार (वय २८) हे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वत:च्या चारचाकीतून प्रवास करत होते. आनेवाडी टोलनाक्यावरुन एका लेनमधून ते चारचाकी नेत असताना त्यांच्या चारचाकीस असणारा फास्ट टॅग स्कॅन केला. मात्र, तो स्कॅन झाला नाही. फास्ट टॅग स्कॅन न झाल्याने टोल नाक्यावरील कर्मचारी आणि मयुरेश शेलार यांच्यात किरकोळ वादावादी झाली. याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी येथे असणाऱ्या किरण बाबुराव सोनावणे (रा. विरमाडे, ता. वाई, जि. सातारा), सचिन अशोक जाधव व इतर १० जणांनी मयुरेश शेलार यांना शिविगाळ व धक्काबुक्की सुरु केली. याच दरम्यान त्यांनी शेलार यांच्यासह चारचाकीत असणाऱ्या निमिष नरेंद्र चव्हाण, प्रथमेश चंद्रकांत घोसाळकर, विठ्ठल भागोजी धुमाळे, दुर्वेश नारायण गिरासे (सर्व रा. नालासोपारा, मुंबई) यांना मारहाण केली.
याबाबतची तक्रार मयुरेश शेलार यांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिल्यानंतर किरण बाबुराव सोनावणे, सचिन अशोक जाधव व इतर दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास हवालदार भोसले करत आहेत.


