Satara

esahas.com

सातारा डि.बी. पथकाची दमदार कारवाई; चोरट्यासह 10 मोटारसायकली हस्तगत

सातारा शहरासह ठिकठिकाणाहून दुचाकी चोरणार्‍या आशुतोष दिपक भोसले (वय 22, मूळ रा.कुशी ता.सातारा सध्या रा. संभाजीनगर, सातारा) याला शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) अटक केली. संशयिताकडून तब्बल 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्याने या दुचाकी चोरी करुन विकल्याचे समोर आले आहे.

esahas.com

वीज बिल थकित प्रकरणी तीन स्टोन क्रशर चालकांवर गुन्हे

शहरालगत महामार्गावर असलेल्या नागेवाडी गावच्या हद्दीतील स्टोन क्रशर चालकांनी वीज बिलात फेरफार करुन लाखो रुपयांचे विज बिल भरले नसल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात स्वतंत्र 3 गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, तब्बल 72 लाख रुपयांचे बिल संशयित तिघांनी थकवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

esahas.com

शिष्यवृत्ती परीक्षेत ऐश्वर्या शिंदे राज्यात तेरावी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आलेल्या आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत आगाशिवनगर (मलकापूर) ता. कराड येथील कु. ऐश्वर्या वसंतराव शिंदे हिने राज्यात गुणवत्ता यादीत 13 वा क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आहे.

esahas.com

कराडची महिला व बालकल्याण समिती राज्यात प्रथम

कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने  २०१७-१८ या वर्षात केलेल्या उत्कृष्ट कार्याची राज्यस्तरावर नोंद घेण्यात आली आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने 'ब' वर्ग नगरपालिका गटात कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीला राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

esahas.com

अजिंक्यतारा किल्ला मार्गावरील गटाराचे काम आमचे नाही

किल्ले अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गालगत गटाराचे काम निकृष्ट झाल्याचा भांडाफोड शिवसेनेने केला होता. या कामाची जबाबदारी सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी नाकारली आहे. ते काम आम्ही केले नसल्याची माहिती संबंधितांनी दिल्याने या गटार बांधकामाच्या प्रकरणात नवीन वळण आले आहे.

esahas.com

ग्रंथमित्र पॅनलची निवडणुकीत बाजी

श्री. छ. प्रतापसिंह महाराज नगर वाचनालयाच्या निवडणुकीत सत्ताधारी ग्रंथमित्र पॅनलने सर्वच म्हणजे बाराही जागा जिंकून विरोधकांना धोबीपछाड दिला . विरोधकांनी मिळवलेल्या मतांनी सत्ताधारी गटाला आत्मपरीक्षण करायला लावले आहे.

esahas.com

आशियातील सर्वांत मोठा इथेनॉल प्रकल्प होणार फलटणमध्ये

उसाचा रस आणि बोयोसिरपवर आधारित आशियातील सर्वांत मोठा इथेनॉल प्रकल्प फलटणमध्ये उभारत असल्याची घोषणा स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेडने केली आहे. प्रकल्पाची क्षमता पहिल्या टप्प्यात प्रति दिन 500 व दुसर्‍या टप्प्यात 1100 किलो लिटरपर्यंत वाढवली जाणार असून, यासाठी आवश्यक मान्यता मिळाली असल्याचेही सांगण्यात आले आहे. हे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांचे यश मानण्यात येत आहे.

esahas.com

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मोफत ई-श्रम कार्डचे वाटप : सुदर्शन पाटसकर

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. यामध्ये मंगळवार पेठ प्रभागातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन संचालक राहुल महाडिक व भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू पाटसकर यांच्या हस्ते ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.

esahas.com

घरफोडीत सुमारे अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

शहरातील कार्वेनाका येथील थोरात हॉस्पिटलशेजारी बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. रविवारी 16 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत संतोष शंकर जाधव रा. मलकापूर यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

esahas.com

युवतीचे अपहरण; युवकावर गुन्हा

'तू आता लग्न कर नाहीतर तुला सोडतच नाही,' असे म्हणून फलटण येथील एका युवकाने सातारा येथील करंजे पेठेत राहणाऱ्या एका वीस वर्षीय युवतीचे अपहरण केल्याची घटना सातारा शहर परिसरात घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.