Satara

esahas.com

विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा

कराड येथे बंगल्याचे काम करण्यासाठी तसेच पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन वीस लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

पोलीस अंमलदाराचा भाजल्याने मृत्यू

सातारा येथील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या आणि भरोसा सेलमध्ये कार्यरत माहिला पोलीस अंमलदार संगीता जेटाप्पा लोणार - काळेल या स्वंयपाक घरात गॅसचा भडका झाल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते. दरम्यान, शनिवार, दि. १५ रोजी रात्री उशिरा त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

esahas.com

विद्यानगर-सैदापूर येथे विना परवाना पिस्तुल बाळगणार्‍यास अटक

विद्यानगर-सैदापूर ता. कराड गावच्या हद्दीत अवैधरित्या विना परवाना पिस्तुल बाळगणार्‍यास कराड शहर पोलिसांनी अटक केली. रविवार दि. 16 रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी संशयिताकडून पिस्तुलसह दुचाकी जप्त केली आहे.

esahas.com

महामार्गावरील गॅस पाईपच्या कामावरील कामगारांना चाकू व कोयत्याच्या धाकाने चोरट्यांनी लुटले...!!

मालखेड, ता. कराड गावच्या हद्दीत पोकलॅन मशिनवरील परप्रांतीय चालकासह त्याच्या कामगाराला चाकू व कोयत्याचा धाक दाखवून लुबाडल्याची घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी त्या दोघांकडील सुमारे 25 हजाराचा ऐवज लंपास केला असून याबाबतची फिर्याद पारसनाथ आवधेश कुमार यादव यांनी कराड ग्रामीण पोलिसात दिली आहे.

esahas.com

जाळ्यात अडकलेल्या तरसाची मुक्तता

सातारा तालुक्यातील मालगाव येथे शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यात एक तरस अडकले होते. या तरसाची मुक्तता सातारा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली असून त्याला सुरक्षितपणे अधिवासात सोडण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातारा तालुक्याच्या जंगली भागात काही शिकारी वन्यप्राण्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी फासे टाकत आहेत, अशा शिकाऱ्यांचा वन विभागाने शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे.

esahas.com

किरण माने प्रकरणाला आता वेगळे वळण

किरण माने यांना त्यांच्या वर्तणुकीमुळे तिनवेळा वाॅर्निंग देऊन मग सिरियलमधून काढण्यात आले. परंतु त्यांनी त्याचा राजकीय स्टंट केल्याचा आरोप 'मुलगी झाली हो' या मालिकेचे लाइन प्रोड्युसर सचिन ससाने यांनी केला आहे.

esahas.com

सोनगाव परिसरात बिबट्याच्या वावरामुळे दहशत

सातारा : सातारा शहराच्या जवळच असलेल्या सोनगाव येथे अनेकदा बिबटय़ाचे दर्शन झाले आहे. परंतु गेल्या दोन दिवसांमध्ये बिबट्याने सोनगाव येथील कदमवस्तीतील दहा कोंबडय़ांचा फडशा पाडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गोठय़ांतील गुरे वाचली. याबाबत वनविभागाकडे माहिती कळवली असल्याचेही त्यांनी सांगितले. बिबट्याचे ठसेही याठिकाणी आढळून आले आहेत.सोनगाव, कुरणेश्...

esahas.com

महिलेस मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

कामथी, ता. कराड येथे किरकोळ कारणावरून महिलेस दोघांनी मारहाण केली. शनिवारी 15 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद संगिता आनंदा पवार (वय 40) रा. कामथी ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

कळंत्रेवाडीनजीक मळी वाहतूक करणाऱ्या टॅंकरला आग

कळंत्रेवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत मळी वाहतूक करणाऱ्या टॅंकरने अचानक पेट घेतला. शनिवारी 15 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. दरम्यान, कराड नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केल्यानंतर सुमारे तासाभरानंतर ही आग आटोक्यात आली.

esahas.com

सातारा शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात शिवसेना आक्रमक

सातारा शहरातील रस्त्यांवर नवीन इमारतीची बांधकामे सेटबॅक न सोडता झाली आहेत. शहराच्या पश्चिम भागात मंगळवार पेठेत काही बिल्डरांनी पालिकेच्या शहर विकास विभागाला हाताशी धरून वर्दळाचे रस्ते तीन मीटरनी गिळंकृत केले आहेत. ही बांधकामे तत्काळ हटवावीत अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा शहर संघटक प्रणव सावंत यांनी दिला.