विद्यानगर-सैदापूर येथे विना परवाना पिस्तुल बाळगणार्यास अटक
कराड शहर पोलिसांची कारवाई : १ लाख रुपयांच्या पिस्तुलसह दुचाकी जप्त
विद्यानगर-सैदापूर ता. कराड गावच्या हद्दीत अवैधरित्या विना परवाना पिस्तुल बाळगणार्यास कराड शहर पोलिसांनी अटक केली. रविवार दि. 16 रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी संशयिताकडून पिस्तुलसह दुचाकी जप्त केली आहे.
कराड : विद्यानगर-सैदापूर ता. कराड गावच्या हद्दीत अवैधरित्या विना परवाना पिस्तुल बाळगणार्यास कराड शहर पोलिसांनी अटक केली. रविवार दि. 16 रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी संशयिताकडून पिस्तुलसह दुचाकी जप्त केली आहे.
अखिलेश सुरज नलवडे (वय 21) रा. गजानन हौंसिग सोसायटी, गोवारे रोड, कराड असे पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी अवैधरित्या पिस्तुल बाळगणार्यांविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार कराड शहर पोलिस ठाण्याअंतर्गत विशेष पथक कार्यरत करण्यात आले होते. दरम्यान, सैदापूर होली फॅमिली येथे संशयित पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांना समजली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक अमित बाबर व ओगलेवाडी दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय गोडसे यांच्यासह विशेष पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे होली फॅमिली परिसरात छापा टाकला. यावेळी संशयित अखिलेश नलवडे याच्याजवळ असलेल्या अॅक्टीवा दुचाकीची पोलिसांनी तपासणी केली. त्या दुचाकीच्या डीकीमध्ये १ लाख रुपये किमतीचे पिस्तुल आढळुन आले. पोलिसांनी पिस्तुल, दुचाकी जप्त करून संशयितास अटक केली.
ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोर्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रजणित पाटील, कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अमित बाबर, सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय गोडसे, पोलिस उपनिरिक्षक अशोक भापकर, सहायक फौजदार संतोष सपाटे, सतीश जाधव, पोलिस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, सचिन सुर्यवंशी, संजय जाधव, संदीप कुंभार, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजित दाभाडे, धीरज कोरडे, किशोर तारळकर यांनी केली. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर करत आहेत.


