maharashtra

अजिंक्यतारा किल्ला मार्गावरील गटाराचे काम आमचे नाही

सातारा पंचायत समितीने हात झटकले

Gutter work on Ajinkyatara fort road is not ours
किल्ले अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गालगत गटाराचे काम निकृष्ट झाल्याचा भांडाफोड शिवसेनेने केला होता. या कामाची जबाबदारी सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी नाकारली आहे. ते काम आम्ही केले नसल्याची माहिती संबंधितांनी दिल्याने या गटार बांधकामाच्या प्रकरणात नवीन वळण आले आहे.

सातारा : किल्ले अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गालगत गटाराचे काम निकृष्ट झाल्याचा भांडाफोड शिवसेनेने केला होता. या कामाची जबाबदारी सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी नाकारली आहे. ते काम आम्ही केले नसल्याची माहिती संबंधितांनी दिल्याने या गटार बांधकामाच्या प्रकरणात नवीन वळण आले आहे.
मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा येथील गटाराच्या काम निकृष्ट कामा प्रकरणी अधिक माहिती घेतली असता सदरील काम हे आमच्या कडे नसल्याचा खुलासा पंचायत समितीचे उच्च अधिकारी खैरमोडे रावसाहेब यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेने या कामाचा भांडाफोड केला होता आज समक्ष पाहणी केली असता येथील काम निकृष्ट असल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी हद्दवाढ झाली असून ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ला हा सातारा पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाला आहे. तत्पूर्वी या किल्ल्याच्या देखभालीसाठी पंचायत समितीमधून निधी उपलब्ध झाला होता. मात्र निधी उपलब्ध होताना फक्त रस्त्याच्या डांबरीकरण यासाठी निधी उपलब्ध झाला होता. त्यामध्ये गटार याचा उल्लेखच केला नसून नक्की गटाराचे काम करते कोण? याचा जावईशोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
पंचायत समितीचे अधिकारी खैरमोडे यांनी सांगितले की, आम्ही सदर रस्ता हा सातारा पालिकेकडे वर्ग करण्यासाठी प्रस्ताव ठेवला असून तो लवकरच वर्ग होईल. तत्पूर्वी हे काम कोण करते याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.